cyclist killed after BMW car having VIP number plate hit him on Mahipalpur flyover delhi spb 94 | Loksatta

VIP नंबरप्लेट असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत ५० वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू; टायर फुटल्याने झाला अपघात

वीआयपी नंबरल्पेट असलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने सायकलस्वाराला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे.

delhi crime
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

दिल्लीच्या वसंतकुंज परिसरातील महिपालपूर उड्डाण पुलावर वीआयपी नंबरल्पेट असलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने एका सायकल स्वाराला धडक दिल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. शुभेंदू चॅटर्जी (५०) असे सायकलस्वाराचे नाव असून ते गुरुग्राम सेक्टर ४९ येथील रहिवारी होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून बीएमडब्ल्यू गाडी जप्त केली असून गाडी चालकालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – दोन वर्षीय चिमुकलीची पित्याकडून हत्या, मग आत्महत्येचा प्रयत्न; मुलीचं पोट भरण्यासाठी पैसे नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रविवारी सकाळी ६ च्या सुमार पीसीआर कॉलद्वारे या घटनेची माहिती मिळाली. सकाळी ६ च्या सुमारास शुभेंदू चॅटर्जी हे सायकलींग करत असताना मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडीने शुभेंदू चॅटर्जी यांच्या सायकलला मागून धडक दिली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा – “माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझे तुकडे करेन”; तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी

दरम्यान, जप्त केलेली बीएमडबल्यू गाडी ही सुनील चंदेर या पश्चिम दिल्लीतील एका मोबाईल व्यापाऱ्याची असून त्या गाडीवर दिल्ली कॅंटनमेंट बोर्डाचे स्टीकर लागले आहेत. गाडी चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली साऊथ वेस्टचे सहाय्यक पोलीस आयुक्त सी. मनोज यांनी दिली आहे. तसेच ही गाडी सुनील चंदेर यांनी सेकंण्ड हॅण्ड विकत घेतली असून त्याने गाडीवर लागलेले कॅंटनमेंट बोर्डाचे स्टीकर काढले नव्हते, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:27 IST
Next Story
दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरप्रमाणे खून! पतीला संपवून मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रिजमध्ये