scorecardresearch

Premium

मिचौंग चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशात ; मुसळधार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरावर तयार झालेले मिचौंग चक्रीवादळ  मंगळवारी, पाच डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान  धडकण्याची शक्यता आहे.

Cyclone Michoung to hit Andhra Pradesh tomorrow
मिचौंग चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशात ; मुसळधार पावसाचा अंदाज

वृत्तसंस्था, चेन्नई 

बंगालच्या उपसागरावर तयार झालेले मिचौंग चक्रीवादळ  मंगळवारी, पाच डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान  धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग  सकाळी ताशी १०० किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता. चक्रीवादळामुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Bharat Jodo Nyay Yatra
पश्चिम उत्तर प्रदेशात राहुल गांधी पुन्हा यात्रा काढणार, परंतु RLD च्या बालेकिल्ल्यांना हादरा बसणार का?
unseasonal rain Vidarbha
‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…
myanmar border
“म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालून सरकार आणखी एक बर्लिनची भिंत तयार करणार”; मणिपूर आदिवासी मंचाच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया
Loksatta explained What are the reasons for less snow in the Himalayas this year
विश्लेषण: हिमालयात यंदा बर्फ कमी पडण्याची कारणे काय?

  हवामान विभागाच्या विशाखापट्टणम् वादळ इशारा केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालिका सुनंदा यांनी सांगितले, की बंगालच्या उपसागराच्या र्नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांमध्ये १८ किलोमीटर प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकला. हे वादळ २ डिसेंबर रोजी पुद्दुचेरीच्या ४४० किमी पूर्वेकडे, चेन्नईच्या पूर्व-आग्नेय दिशेला ४५० किमी, नेल्लोरच्या आग्नेय-पूर्व दिशेने ५८० किमी,  बापट्लाच्या ६७० किमी आग्नेय-पूर्व आणि मछलीपट्टणमच्या दक्षिण-आग्नेय दिशेस ६७० किमीवर होते, हे चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात र्नैऋत्य भागात तीव्र होण्याची शक्यता आहे.  त्यानंतर, ते वायव्येकडे सरकेल आणि ४ डिसेंबरच्या दुपापर्यंत तामिळनाडूच्या उत्तर भागातील किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात पोहोचले. त्यानंतर ते जवळपास उत्तरेकडे जवळजवळ समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत सरकेल आणि ५ डिसेंबरच्या दुपारदरम्यान नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडेल. त्यावेळी चक्री वादळाच्या वाऱ्यांचा ताशी  ८०-९० किमी वेगवान असण्याची शक्यता आहे.हा वेग ताशी १०० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >>>जगभरात दरवर्षी २०० कोटी टन धूळ वातावरणात!

चेन्नई येथील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी शनिवारी सांगितले, की, बंगालच्या उपसागराच्या र्नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.  हे वादळ सतत वायव्य दिशेने सरकत आहे. पुढील २४ तासांमध्ये चक्रीवादळ आणखी विध्वंसक होण्याची शक्यता आहे. ते वायव्येस पुढे सरकेल आणि ४ डिसेंबपर्यंत दक्षिण आंध्रलगतच्या उपसागरातील पश्चिम-मध्य भागात आणि तमिळनाडू उत्तर किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

आंध्र-तमिळनाडूला १२ तासांसाठी इशारा

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तमिळनाडू किनारपट्टीसाठी पुढील १२ तासांसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

या काळात वेगवान वारे आणि मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बंगालच्या उपसागरावरील र्नैऋत्य भागातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पुढील १२ तासांत चक्रीवादळ तीव्र होईल आणि ४ डिसेंबरच्या दुपापर्यंत  तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल.

बंगालच्या उपसागरावरील र्नैऋत्य भागातील कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांत ताशी दहा किमी वेगाने वायव्येकडे सरकला. त्याच भागात २ डिसेंबर २०२३ रोजी केंद्रस्थानी होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cyclone michoung to hit andhra pradesh tomorrow amy

First published on: 04-12-2023 at 05:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×