मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री अॅड्. प्रा. जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी चांदूरकर यांच्या नावाला संमती दिल्यामुळे एन. एम. कांबळे यांच्यानंतर पहिल्यांदाच मुंबई विभागीय काँग्रेस समितीला मराठी व दलित अध्यक्ष लाभला. बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेले कृपाशंकर सिंह यांची गेल्या वर्षी उचलबांगडी करण्यात आल्यानंतर मुंबई विभागीय काँग्रेसला मराठीच अध्यक्ष लाभणार असल्याचे संकेत मिळत होते. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच कुठल्याही गटाचा शिक्का नसलेले सत्तरीच्या घरातील चांदूरकर यांच्याबरोबरच अध्यक्षपदासाठी आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार मधु चव्हाण आणि विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप या नावांची चर्चा होती. पण माजी आमदार चांदूरकर यांनी बाजी मारली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी चांदूरकर
मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री अॅड्. प्रा. जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी चांदूरकर यांच्या नावाला संमती दिल्यामुळे एन. एम. कांबळे यांच्यानंतर पहिल्यांदाच मुंबई विभागीय काँग्रेस समितीला मराठी व दलित अध्यक्ष लाभला.

First published on: 05-04-2013 at 03:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit leader janardan chandurkar is mumbai congress chief