उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका दलित महिलेवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक म्हणजे पीडितेला अंमली पदार्थ पाजून जबरदस्तीने गोमांसही खाऊ घातले. या गुन्ह्यात पीडित मुलीच्या मैत्रीणीचाही समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पीडित मुलीकडून आरोपींनी ३० हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते पैसे परत देण्याकरता तिला एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. या हॉटेलमध्ये शोएब, नदीम होते. तर तिची मैत्रीण शिफतही होती. या तिघांनी आधी तिला गोमांस खाऊ घातले. त्यानंतर तिला थंड पेय पाजले. या थंड पेयातून तिला अंमली पदार्थ पाजण्यात आले होते. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एवढंच नव्हे तर, या कृत्याचे शिफतने चित्रिकरणही केले. हा व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यात आले. ५ लाख रुपये दे, नाहीतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी दिली.

हेही वाचा >> “अनैतिक संबंधातून खून, अपघाताचा रचला बनाव”, अखेर ७ वर्षांनी उलगडलं गूढ

दरम्यान, बलात्काराचा व्हिडीओ या आरोपींनी पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याने तत्काळ पोलिसांत धाव घेत याविरोधात तक्रार दाखल केली. बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी सांगितले की, “एससी/एसटी कायद्यासह आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.”

हेही वाचा >> सख्खा मेहुणा पक्का वैरी; रायगडमध्ये तरुणाची डोक्यात गोळ्या घालून हत्या, नेमकं कारण आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोएब हा बी फार्मचा विद्यार्थी असून नदीम सलूनचं दुकान चालवतो. दरम्यान, याप्रकरणानंतर नदीम काश्मीरला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केली.