येथील तिगरी भागात काल संध्याकाळी एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
एका पार्कमध्ये ही मुलगी खेळत असताना तिचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे.  सदर मुलीला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघे फरार आहेत. मुख्य आरोपीचे वय १६ वर्ष असून, त्याला महानगर न्यायदंडाधिका-यांपुढे हजर करण्यात आले. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबाला ओळखत होता. तो सुध्दा त्याच वस्तीमध्ये रहातो.
मागच्या दोन दिवसातील दिल्लीतील बलात्काराची ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी नजफगड भागात १४ वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता.