दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या प्रचारसभांमधून सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यापाठोपाठ आता दिल्लीमधे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अरविंद केजरीवाल सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. हीच प्रतिष्ठा जपण्यासाठी केजरीवाल या निवडणुकीत दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले असून आपचा जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या अशाच एका रॅलीमध्ये प्रत्यक्ष आपचे नेते आणि काही आमदारांचेच मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० मोबाईल चोरीला गेल्याची घटना!

बुधवारी आपकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या माल्क गंज भागातून ही रॅली जात असताना या रॅलीत तब्बल २० मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आपचे काही आमदार आणि नेतेमंडळींचाही समावेश आहे. दिल्ली नॉर्थचे डीसीपी सागर कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपच्या रॅलीदरम्यानच ही चोरी झाली असून त्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi aap arvind kejriwal rally for mcd election mla mobiles stolen pmw
First published on: 01-12-2022 at 09:37 IST