दिल्लीत रविवारी ( १ जानेवारी ) अपघाताची थरकाप उडवणारी घटना समोर आली होती. कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या अपघातानंतर तरुणीचा मृतदेह रस्त्यावर नग्नावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पण, तरुणीच्या अपघातानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यात मृत्यचं कारण सांगण्यात आलं आहे.

अंजली सिंग, असं मृत्यू झालेल्या २० वर्षीय तरुणीचं नाव आहे. एका कारने अंजलीच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कार न थांबवता चालकाने अंजलीला सुलतानपूरी ते कांझावालापर्यंत फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं. याप्रकरणी मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात अंजलीचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यामध्ये अंजलीचा मृत्यू गंभीर जखमांमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही वाचा : “अंजली वाचवा-वाचवा म्हणत होती, पण…”, दिल्ली अपघाताबाबत दुचाकीवरील मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शवविच्छेदन अहवालात अंजलीच्या शरीरावर ४० जखमा होत्या. त्यात कारखाली शरीर आल्याने डोक्याचे काही भाग गायब झाले होते. फुफ्फुसेही शरीराबाहेर आली होती. तसेच, अति रक्तस्त्राव, डोक्याला, हाडांना दुखापत झाल्याने मृत्यू झाला, असं शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : चालक म्हणाला गाडीखाली काहीतरी अडकलंय, मित्र म्हणाले ‘काही नाही, गाडी चालव’; दिल्ली अपघातातील धक्कादायक खुलासा

दरम्यान, मंगळवारी पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी म्हटलं की, “तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं समोर आलं आहे. कारखाली आल्याने पाठीला गंभीर दुखापत झाली होती. तसेच, तरुणीचा मृत्यू रक्तस्त्राव, डोक्याला मार, पाठीचा कणा मोडल्याने झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं,” असं हुड्डा यांनी सांगितलं होतं.