२४ वर्षे जुन्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोनलाच्या संस्थापक मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मेधा पाटकर आणि व्ही. के. सक्सेना यांच्यात हा वाद मागच्या २४ वर्षांपासून सुरु आहे. आता मेधा पाटकर यांना साकेत न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.

हे प्रकरण नेमकं काय?

व्ही. के. सक्सेना हे अहमदाबादच्या नॅशन कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी मेधा पाटकर आणि त्यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही संस्था सरदार सरोवराच्या बाजूने होती. ज्यानंतर मेधा पाटकर यांनी सक्सेना यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. तर सक्सेना यांनी यानंतर मेधा पाटकर यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. ज्या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी लागला आहे आणि मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
chief justice of India Dhananjay Y Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली
Thieves at ST station increase in incidents of theft from commuters during Diwali
एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट, दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं?

तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो याची जाणीव असूनही मेधा पाटकर यांनी जाहीररित्या आरोप केल्याचं स्पष्ट झालं असं साकेत न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच मेधा पाटकर यांची कृती चुकीच्या हेतूने प्रेरित होती असंही म्हटलं आहे. मेधा पाटक यांनी सक्सेना यांना त्यावेळी देशभक्त नसलेला माणूस आणि पळपुटा असं म्हटलं होतं. तसंच हवाला गैरव्यवहारांमध्ये हात असल्याचाही आरोप केला होता. मेधा पाटकरांनी केलेले आरोप तक्रारदाराचा अपमान करणारे आणि त्याच्याबाबत नकारात्मक मत तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं दिसून येतं असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

हे पण वाचा- अस्तित्वाचे प्रश्न दुर्लक्षून अस्मितेचे प्रश्न आणणे लोकशाहीचा खेळखंडोबा, मेधा पाटकरांचे मत

मेधा पाटकर यांनी आयपीसीच्या कलम ५०० अंतर्गत दंडनीय गुन्हा केला आहे. त्यामुळे त्या दोषी आहेत. त्यांनी जाणूनबूजून तक्रारदाराची बदनामी केली. मेधा पाटकरांनी जे काही आरोप केले ते फक्त तक्रारदाराची बदनामी करण्यासाठीच होते. मेधा पाटकरांच्या कृतींमुळे लोकांच्या नजरेत सक्सेना यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या विश्वासार्हतेला खरोखरच मोठे नुकसान झाले आहे असंही न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणात मेधा पाटकर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यांना दोन वर्षे शिक्षा होण्याचीही शक्यता आहे. यासंदर्भात मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.