दिल्लीतलं श्रद्धा वालकर हत्याकांड ताजं असतानाच असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत साहिल गहलोत या २४ वर्षीय तरुणाने त्याची लिव्ह इन पार्टनर निक्की यादव हिचा खून करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खूनानंतर साहिलने दुसऱ्या तरुणीसह लग्नदेखील केलं. प्रेयसीने लग्नाला विरोध केल्याने साहिलने तिचा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण दिल्ली शहर हादरलं आहे.

साहिलने ही हत्या १० फेब्रुवारी रोजी सोसायटीच्या पार्किंगमध्ये सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान केली. खून करून साहिलने निक्कीचा मृतदेह त्याच्या ढाब्यातल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला.

संपूर्ण घटनाक्रम

१. निक्की यादव (२४) हिने ९ फेब्रुवारी रोजी साहिलला फोन केला होता. तिला त्याच्या साखरपुड्याची माहिती मिळाली होती. निक्कीपासून लपवून त्याने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केला होता. निक्कीला अंधारात ठेवून तो पळून जाणार होता.

२. त्याच दिवशी रात्री साहिल निक्कीच्या फ्लॅटवर आला आणि निकीला बाहेर घेऊन गेला. दोघेही साहिलच्या चुलत भावाच्या कारमधून बाहेर गेले. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.

३. साहिल आणि निक्की रात्री निजामुद्दीन आणि आनंद विहारसह अनेक ठिकाणी फिरले.

४. साहिल आणि निक्की रात्रभर कारने फिरत होते. फिरता फिरता दोघेही शहरातून पळून जाण्याचं प्लॅनिंग देखील करत होते. त्याचदरम्यान, साहिलला त्याच्या घरून फोन येऊ लागले. साहिलचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. साहिल अशा वेळी रात्रभर घरी नसल्याने चिंतेने त्याच्या घरचे त्याला फोन करत होते. दरम्यान, कारमध्ये साहिल आणि निक्कीचं भांडण झालं आणि त्याने मोबाईलच्या चार्जिंग केबलने निक्कीचा गळा आवळला.

५. निक्कीची हत्या केल्यानंतर साहिल कार वेगाने पळवू लागला. काश्मीरी गेटपासून नजफगडपर्यंत ४० किमी अंतर त्याने न थांबता कार चालवली. संपूर्ण प्रवासात निक्कीचा मृतदेह कारमध्ये त्याच्या शेजारच्या सीटवर सीट बेल्टने बांधलेल्या अवस्थेत होता.

६. साहिल कार घेऊन त्याच्या ढाब्यावर गेला. तिथे कार उभी करून निक्कीचा मृतदेह त्याने कारच्या बूटमध्ये (डिक्कीमध्ये) हलवला.

७. निक्कीचा मृतदेह कारमध्ये ठेवून तो त्याच्या घरी मडोठी या गावी गेला आणि त्याच्या लग्नसोहळ्याच्या तयारीत सहभागी झाली.

हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका! इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतायत ‘इतके’ रुपये !

८. लग्न पार पडल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता साहिल त्याच्या नवविवाहित पत्नीसह त्याच्या गावी गेला.

९. त्या रात्री सर्वजण झोपल्यानंतर साहिल घराबाहेर पडला. कार घेऊन तो ढाब्यावर गेला. तिथे गेल्यावर त्याने कारच्या बूटमधला मृतदेह ढाब्यातल्या फ्रीजमध्ये हलवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०. त्यानंतर साहिलने निक्कीचा फोन घेतला, त्यातले दोघांचे चॅट्स आणि कॉल्स डिलीट केले आणि फोन बंद केला.