शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयात तीन जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

“शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
mumbai high court,
दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर उच्च न्यायालय आज निर्णय देणार, प्रदीर्घ सुनावणीनंतर गेल्या वर्षी निर्णय राखून ठेवला होता
NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?
Calcutta High Court
संदेशखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार; कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आदेश

हेही वाचा : “तिने काय-काय लफडी केली…” सुषमा अंधारेबाबत केलेल्या विधानावर शिरसाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

याप्रकरणी शिवसेना ( शिंदे गट ) खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर आज ( २८ मार्च ) सुनावणी पार पडली. तेव्हा उच्च न्यायालयाने तिघांना हजर राहण्यासाठी समन्य बजावलं आहे. यावर आता १७ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवण्याची शक्यता, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार दाखल; म्हणाल्या, “या विकृत आमदाराने…”

“उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना आणखी बदनामीकारण आरोप करण्यापासून रोखण्यात यावं,” अशी विनंती राहुल शेवाळे यांचे वकील राजीव नायर यांनी न्यायालयाला केली. त्यावर “हे राजकीय प्रकरण आहे. प्रतिवाद्याचं मत ऐकूनच निर्णय दिला जाईल,” असं न्यायालयाने सांगितलं.