दिल्ली पोलिसांना मोठं यश, श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी वापरलेलं हत्यार आणि रिंग जप्त | Delhi Police recovered weapon and ring of Shraddha gifted to girlfriend | Loksatta

दिल्ली पोलिसांना मोठं यश, श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी वापरलेलं हत्यार आणि रिंग जप्त

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. दिल्ली पोलिसांना आरोपी आफताबने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेलं हत्यार सापडले आहे.

Delhi-Vasai-Murder-Case
श्रद्धा वालकर खून प्रकरण (फोटो सोजन्य – संग्रहित छायाचित्र)

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. दिल्ली पोलिसांना आरोपी आफताबने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली हत्यार सापडले आहे. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने सोमवारी (२८ नोव्हेंबर) सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी २७ वर्षीय श्रद्धा वालकरची एक रिंगही हस्तगत केली आहे. ही रिंग श्रद्धाच्या खूनानंतर आरोपी आफताबने आपल्या नव्या प्रेयसीला दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुढील तपासात अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पोलिसांकडून आफताबची पॉलीग्राफी चाचणीही करण्यात येत आहे. सोमवारी दिवसभर काही सत्रांमध्ये त्याची चाचणी करण्यात आली. यात आफताबकडून सहकार्य मिळत आहे. मात्र, त्याला त्याची तब्येत असल्याने पॉलीग्राफी चाचणीचे काही निकाल प्रभावित झाले. त्याला ताप असून त्याची औषधंही सुरू आहे. त्यामुळे त्याला मध्ये विश्रांती देत या चाचण्या करण्यात आल्या. आता उरलेल्या सत्रांमधील पॉलीग्राफ चाचणीही लवकरच होणार आहे.

पॉलीग्राफी चाचणीनंतर तुरुंगात परतताना आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

आफताबची सोमवारी सकाळपासून दिल्लीत पॉलीग्राफी चाचणी सुरू होती. चाचणी झाल्यानंतर आफताबला सायंकाळी पुन्हा तुरुंगात नेण्यात येत होतं. त्याचवेळी तीन-चार जणांनी तलवार घेऊन येत गाडीवर हल्ला चढवला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : Photos : दिल्लीत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, देहरादूनमध्ये अनुपमाचे ७२ तुकडे; दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं काय साम्य?

तलवारीने वार करत असलेल्या आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली.

पोलिसांनी हल्लेखोरांना आफताबपर्यंत पोहचू दिलं नाही. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात आफताबला कोणतीही दुखापत झालेली नाही.

हेही वाचा : Photos : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबने कबुलीजबाब फिरवला तर? माजी DGP म्हणाल्या, “मी नेहमी सांगायचे…”

हल्ला करणारा आरोपी हल्ला करताना “आम्ही गुरुद्वारातून ही तलवार घेऊन आलो आहे. आफताबला दोन मिनिटे गाडीच्या बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू,” असं बोलतानाही आढळलं. आम्ही बंदुक आणि रायफलही आणू आणि आफताबला मारून टाकू, असंही हे आरोपी बोलताना दिसले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 20:53 IST
Next Story
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”