देशाच्या राजधानीत काही दुकानदारांनी केलेल्या हल्ल्यात अरूणाचल प्रदेशच्या मुलाचा झालेल्या मृत्यूनंतर मणिपुरी मुलीवर झालेला बलात्कार, या घटनांनंतर सोमवारी रात्री दक्षिण दिल्ली भागात आंबेडकर नगर येथे ईशान्येकडील मणिपूर राज्यातून आलेल्या दोन युवकांना काठीने मारहाण करण्यात आली.
गिनखासुआन नौलक (२४) व त्याचा चुलतभाऊ वुमसुआनमुंग नौलक (२५) यांना मोटरसायकलवरून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण केली. ते रात्री साडेआठ वाजता बाजारात गेले असताना ही घटना घडली. दोघांनाही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले असून वुमसुआनमुंग याला प्रथमोपचारानंतर सोडून देण्यात आले, तर गिनखानसुआन याच्यावर ट्रॉमा सेंटर येथे उपचार सुरू आहेत. त्याला बरेच लागले असून त्याच्या डाव्या कानास गंभीर दुखापत झाली, त्यामुळे टाके घालण्यात आले आहेत. त्याच्या पोटातही दुखत आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हल्लेखोरांनी त्यांच्याकडून काही लुटले नाही, त्यामुळे हल्ल्याचा हेतू समजू शकला नाही. निदो तानिया या अरूणाचलच्या युवकाचा दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. नंतर दक्षिण दिल्लीत मुनिरका भागात एका चौदा वर्षे वयाच्या मणिपुरी मुलीवर बलात्कार करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
दोन मणिपुरी युवकांवर दक्षिण दिल्लीत हल्ला
देशाच्या राजधानीत काही दुकानदारांनी केलेल्या हल्ल्यात अरूणाचल प्रदेशच्या मुलाचा झालेल्या मृत्यूनंतर मणिपुरी मुलीवर झालेला बलात्कार,
First published on: 11-02-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi two manipuri youth thrashed in alleged case of racist attack