Woman Cuts Off Husband’s Genitals: दिल्लीच्या रुप नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पतीच्या रोजच्या भांडणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. शनिवारी पती नशेच्या अमलाखाली घरी आल्यानंतर दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर पत्नी घर सोडले आणि ती बाहेर निघून गेली. ती येईपर्यंत पती झोपला होता. तेव्हा झोपेत असताना पत्नीने पतीवर वार केले. यामध्ये त्याच्या गुप्तांगाला जखम झाली. पतीवर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरच्या रात्री सदर घटना घडली. शनिवारी पतीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. ज्यात त्याने सांगितले की, तो मुळचा बिहारचा आहे. काही महिन्यांपूर्वी तो पत्नीसह दिल्लीत आला होता. शक्ती नगर येथे एका वसतिगृहात तो मदतनीस म्हणून काम करत होता.

भांडणाच्या दिवशी तो मद्याच्या नशेत होता. त्यात त्याचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले. भांडण झाल्यानंतर पत्नीने घर सोडले आणि ती निघून गेली. थोड्यावेळाने त्यालाही झोप लागली. त्यानंतर काही वेळाने पत्नी घरी परतली आणि तिने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्याच्या गुप्तांगाला मार लागला, अशी माहिती पीडित पतीने पोलिसांना दिली. तसेच या दोघांचेही हे तिसरं लग्न असल्याची माहितीही पतीनं दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हल्ल्यानंतर पत्नीने पळ काढला असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.