डेरा सच्चा सौदाच्या दोन साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ११०० कोटी रूपयांचे साम्राज्य उभे करणारा हा स्वयंघोषित संत सध्या तुरुंगात रोज सक्तमजुरीची कामेही करतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसातील ८ तास काम केल्यानंतर त्याला त्याचा मोबदला म्हणून २० रूपये मिळतात. ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तानुसार बाबा राम रहिमला सध्या भाजी लागवडीचे काम देण्यात आले आहे. त्याने पिकवलेल्या या भाज्यांची विक्री होणार नाही तुरुंगातील कैद्यांसाठीच त्या वापरण्यात येणार आहेत असे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. बाबा राम रहिमचा समावेश अप्रशिक्षित कैद्यांच्या गटात करण्यात आला आहे. त्याचमुळे शेतात काम करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

बाबा राम रहिमला कोणतीही व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे. त्याला फक्त एक पलंग देण्यात आला आहे. एवढेच नाही तर तुरुंगातील एकाही महिला कर्मचाऱ्याला राम रहिमच्या कोठडीपर्यंत जाऊ दिले जात नाही असेही ‘इंडिया टुडे’ने स्पष्ट केले आहे.

रोहतकच्या सुनेरिया तुरुंगात बाबा राम रहिमची रवानगी करण्यात आली आहे. राम रहिमने त्याला भेटायला येणाऱ्या १० लोकांची यादी पोलिसांना दिली आहे. ज्यापैकी त्याची आई नसीब कौरचे तपशीलच पडताळणीत स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नसीब कौर जेव्हा राम रहिमला भेटण्यासाठी आली होती तेव्हा तिने दोन धार्मिक पुस्तके, एक चप्पल जोड आणि काही कपडे आणले होते असेही पोलिसांनी म्हटले. बाबा राम रहिमसोबत राहणारी त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत फरार आहे. पोलीस तिचाही शोध घेत आहेत. हनीप्रीत नेपाळला दिसल्याचे समजले आहे. पोलीस त्या दृष्टीने शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dera sachcha sauda chief gurmeet ram rahim growing vegetables for rs 20 a day in rohtak jail
First published on: 19-09-2017 at 18:41 IST