काश्मीरमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचे मुद्दे मांडत दोन रॅपर्सनी एक रॅप साँग म्हटलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या गाण्यात असलेल्या दोन रॅपर्सनी लक्ष वेधलं आहे.

या गाण्यामध्ये काय आहे?

व्हायरल होणाऱ्या गाण्यात नवं काश्मीर या थीमवर जोर दण्यात आला आहे. काश्मीरमध्ये होणारा विकास, सुधारणारं पर्यटन, संपत चाललेली दहशत या शब्दांवर भर देण्यात आला आहे. डिजिटल इंडियाच्या प्रगतीचाही उल्लेख या रॅप साँगमध्ये आहे. तसंच जी २० परिषदांचाही उल्लेख त्यात आहे.

भारत सरकारच्या वेब पोर्टलनेही पोस्ट केलं गाणं

भारत सरकारच्या वेब पोर्टलनेही हे गाणं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. काश्मीरच्या युवकांना काय वाटतं ते सांगणारं गाणं या आशयाचं कॅप्शन देऊन सरकारने हे गाणं पोस्ट केलं आहे. एवढंच नाही तर विविध दिग्गजांनी हे रॅप साँग शेअर केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी क्रिकेटर सुरेश रैना यांनी त्यांच्या एक्स या टाइमलाइनवर व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि म्हटलं आहे की हे दोन कलाकार प्रो लेव्हलचे आहेत. खूप छान. माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत या रॅपला एक अद्भुत रॅप असं म्हटलं आहे.