भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या वाटचालीवर कोरडे ओढून पदत्याग करणाऱया लालकृष्ण अडवानी यांच्या मनधरणीसाठी पक्षातील काही ज्येष्ठ नेते कार्यरत झालेत. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या गोटात घडणाऱया वेगवान घडामोडींचा हा संक्षिप्त आढावा…
- अनंतकुमार अडवानी यांच्या निवासस्थानी.
- व्यंकय्या नायडूंनी घेतली राजनाथसिंह यांची भेट
- राजीनाम्याचे पत्र बघितल्यावरच प्रतिक्रिया देऊ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
- भारतीय जनता पक्षातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत – राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक शरद यादव यांची प्रतिक्रिया
- भाजप म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ हेच सिद्ध झाले – राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिक्रिया
- अडवानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मोठे नेते – शिवसेनेची प्रतिक्रिया
- मुख्तार अब्बास नक्वी अडवानींच्या भेटीसाठी पोचले
- अडवानींचे मन वळविण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ – सुषमा स्वराज</strong>
- सुषमा स्वराज अडवानींच्या घरी पोहोचल्या
- विजयकुमार मल्होत्रा अडवानींच्या निवासस्थानी पोचले
- अडवानींच्या निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक
- अडवानींच्या राजीनाम्याचा भाजपच्या इतर पक्षांसोबत असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो – नितीशकुमार
- अडवानींशिवाय एनडीएचा विचारच करू शकत नाही – शिवसेना