मागच्या २० वर्षांपासून ढाबा चालवणारे ६० वर्षीय मोहम्मद सलीम यांनी सातत्याने येणाऱ्या धमक्यांना कंटाळून अखेर त्यांच्या ढाब्याला असलेलं हिंदू नाव ( Dhaba Name ) बदललं आहे. मोहम्मद सलीम हे संगम शुद्ध शाकाहारी भोजनालय चालवत होते. मात्र ते धर्माने मुस्लीम असल्याने तुमच्या भोजनालयाला हिंदू नाव द्यायचं नाही अशा धमक्या त्यांना देण्यात आल्या. ज्यामुळे त्यांनी त्यांच्या भोजनालयाचं नाव बदललं आहे.
नेमकी ही घटना कुठे घडली आहे?
आग्रा येथील दिल्ली देहरादून रोडवर त्यांचं हे भोजनालय आहे. या भोजनलयाचं नाव आता सलीम शाकाहारी भोजनालय ( Dhaba Name ) असं करण्यात आलं आहे. स्वामी यशवीर महाराज यांचा आश्रम याच भागात आहे, त्यांच्या भक्तांकडून मला सातत्याने धमक्या येत होत्या आणि नाव बदलण्यास सांगितलं जात होतं. ढाबा, भोजनालय ( Dhaba Name ) चालवणाऱ्या मुस्लीम मालकांनी हिंदू नावं द्यायची नाहीत असं त्यांनी सांगितल्याचं सलीम यांनी सांगितलं.
हे पण वाचा- Bihar Crime News : गोमांस विकल्याच्या संशयावरून मुस्लीम व्यक्तिला मारहाण; १९ जणांवर गुन्हा, दोघांना अटक
ढाब्याचं नाव सलीम ढाबा करण्यात आलं आहे
आता या ढाब्याचं नाव सलीम ढाबा ( Dhaba Name ) असं करण्यात आलं आहे. मोहम्मद सलीम यांनी सतत येणाऱ्या धमक्यांमुळे हे नाव आम्ही बदललं. आम्ही मुस्लीम राजपूत आहोत त्यामुळे आम्ही आम्ही आडनाव ठाकूर लावतो. त्यामुळेच मी प्रोपरायटर सलीम ठाकूर असं नाव लावतो असंही सलीम यांनी सांगितलं.
सलीम यांनी काय सांगितलं?
सलीम यांनी सांगितलं की, ज्या ढाब्याचं ( Dhaba Name ) नाव बदललं तो माझ्या वडिलांच्या काळापासून आहे. मात्र मला या ढाब्याचं नाव बदलावं लागलं कारण स्वामींनी मला बऱ्याच धमक्या दिल्या आहेत. मी सुरुवातीला मान्य केलं नाही, पण नंतर मी शांत राहिलो. दोन पावलं मागे झालो आणि नाव बदललं. या प्रकरणाला धर्माचा रंग लागावा असं मला वाटलं नाही त्यामुळे मी नाव बदललं असं मोहम्मद सलीम यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
स्वामी यशवीर यांचा व्हिडीओ व्हायरल
स्वामी यशवीर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं होतं जे मुस्लीम आहेत त्यांनी हिंदू नावं त्यांच्या आस्थापना आणि हॉटेल्सना दिली असतील त्यांनी बदलावी. जर तसं घडलं नाही तर सनातन धर्मम वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही स्वामींनी दिला होता. ७ सप्टेंबरला सकाळी १० वाजेपर्यंत हिंदू नावं मुस्लीम मालकांनी बदलली पाहिजेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. डीएसपी संत कुमार यांनी ही माहिती दिली की सदरचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हातळत आहोत. तसंच पोलीस अधिकारी निकिता शर्मा म्हणाल्या की आम्ही स्वामींना आम्ही सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही इशारे देऊ नका.