उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील दुर्जनपूर गावात घडलेल्या गोळीबारातील प्रमुख आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तीन दिवसांपासून फरार धीरेंद्र सिंह लखनऊमधील जनेश्वर मिश्र पार्क येथून पकल्या गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धीरेंद्र सिंहवर उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आतापर्यंत नावाजलेल्या आठ आणि जवळपास २५ अज्ञात आरोपींपैकी केवळ ९ जणांना अटक झालेली आहे.

या हत्याकांडातील नावाजलेले आरोपी संतोष यादव व अमरजीत यादव यांना पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली होती. तर, सह आरोपी अगोदरच अटक करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी मुख्य आरोपी धीरेंद्रचे भाऊ नरेंद्र प्रताप सिंह, देवेंद्र प्रताप सिंह यांना देखील अटक केली होती. तर, शनिवारी याचप्रकरणी मुन्ना यादव, राजप्रताप यादव व राजन तिवारी यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते.

बलियातील दुर्जनपूर गावात दोन गटांत सरकारी दुकान वाटपावरून उफळलेल्या वादानंतर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhirendra singh and his accomplices were arrested from lucknow today msr
First published on: 18-10-2020 at 13:56 IST