आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढल्या असल्याने डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्या, आस्थापने, उद्योग यांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण त्यांना डिझेल खरेदी करताना आता लीटरमागे २५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. मात्र दिलासायदाक बाब म्हणजे किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही.

घाऊक खरेदी करणारे बस ऑपरेटर्स, मॉल्स यांच्यासारखे मोठे वापरकर्ते नेहमीप्रमाणे तेल कंपन्यांना थेट ऑर्डर देत नसून इंधन खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याने पेट्रोल पंपावरील विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना नुकसान सहन करावं लागत आहे.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

सर्वात जास्त नुकसान नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी किरकोळ विक्रेत्यांना बसला आहे, ज्यांनी आतापर्यंत विक्रीत वाढ होऊनही प्रमाण कमी करण्यास नकार दिला आहे. पण दरात १३६ दिवसांमध्ये बदल न झाल्याने त्याच दरात अधिक इंधन विकण्यापेक्षा पंप बंद करणे हा अधिक योग्य उपाय असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.

२००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील आपले सर्व १४३२ पेट्रोल पंप बंद करावे लागले होते, कारण सार्वजनिक क्षेत्राने दिलेल्या किंमतीशी ते स्पर्धा करु शकत नसल्याने त्यांची विक्री जवळपास शून्यावर आली होती. मोठ्या प्रमाणात वापरकर्ते पेट्रोल पंपांकडे वळवल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान वाढत असल्याने अशीच परिस्थिती पुन्हा उलगडू शकते.

घाऊक वापरकर्त्यांना विकल्या जाणार्‍या डिझेलची किंमत मुंबईत १२२.०५ रुपये प्रति लीटर झाली आहे. पेट्रोल पंपावर हाच दर ९४.१४ रुपये इतका आहे. दिल्लीतील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ८६.६७ रुपये मोजावे लागत असताना घाऊक खरेदीसाठी हा दर ११५ रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि इंधनाच्या किंमतीत वाढ होत असताना सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ४ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. चार राज्यांमध्ये असणाऱ्या निवडणुकांमुळेच भाजपाने किंमती वाढू दिल्या नसल्याचं बोललं जात होते. १० मार्चला मतमोजणीनंतर या किंमती वाढतील अशी शक्यता होती. पण अद्याप तसं झालेलं नाही.