काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत येणं कठीण असल्याचं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. भाजपला 2019 च्या निवडणुकांमध्ये हरवायचं असेल तर काँग्रेसच्या सहयोगी पक्षांनी काही गोष्टींवर तडजोड करणं गरजेचं आहे. कोलकात्यात पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत खुर्शीद बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपला सत्तेतून घालवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक समविचारी पक्षाला आघाडी होणं गरजेचं वाटत असेल तर काही गोष्टींवर तडजोड करावीच लागेल, काँग्रेसही तडजोडीसाठी तयार आहे. मात्र सहयोगी पक्षांनी काँग्रेसला वेठीस धरण्याचा प्रयत्न करु नये.” खुर्शीद यांनी आपली भूमिका मांडली.

अवश्य वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचं विभाजन करायचे आहे-राहुल गांधी

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकतं का, असा प्रश्न विचारला असता खुर्शीद यांनी नकार दिला. सध्याच्या घडीला ही गोष्ट शक्य नाहीये. जर आम्हाला स्वबळावर सत्तेत यायचं असेल तर गेल्या 5 वर्षांमध्ये तशी विधायक कामं होणं गरजेचं होतं. निवडणुकांच्या आधी काही काळ तुम्ही अचानक स्वबळावर लढून सत्तेत येण्याची भाषा कराल तर तसं होणं शक्य नाही. सध्या समविचारी पक्षांसोबत आघाडी करणं हे काँग्रेससमोरचं उद्दीष्ठ असून सध्या त्यावर काम सुरु असल्याचं खुर्शीद म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult for congress to come to power on its own says salman khurshid
First published on: 21-10-2018 at 18:28 IST