निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेसची परंपरा नाही

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेस पक्षाची परंपरा नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले आहे.

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेस पक्षाची परंपरा नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्या शिंदे तेथील मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा होती. त्या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर निवडून आलेले आमदार आपल्या मुख्यमंत्र्यांची निवड करतात ही काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. या वर्षअखेरीला मध्य प्रदेशात निवडणूक होणार असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे, अशी अटकळ बांधली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disclosing names of cm candidate before election is not congress convention digvijay singh

ताज्या बातम्या