पीटीआय, नवी दिल्ली

मतदार ओळखपत्र आधारशी जोडणीबाबत प्रचलित कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार कृती केली जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच आधार प्राधिकरणाशी लवकरच चर्चा सुरू केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.

निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव, कायदा मंत्रालय तसेच माहिती तंत्रज्ञान सचिव तसेच आधार प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे उत्तर राज्यसभेत सरकारने एप्रिल २०२३ मध्ये दिले होते. तसेच यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. ज्यांनी आधार जोडणी केली नाही त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नसल्याचे सरकारने या वेळी स्पष्ट केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ भारताच्या नागरिकालाच घटनेनुसार मतदानाचा हक्क मिळतो तर आधारने व्यक्तीची ओळख स्थापित होते. त्यामुळेच घटनेनुसार मतदान ओळखपत्र आधारला जोडले जाईल असे ठरविण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले.