scorecardresearch

Premium

VIDEO : “भाजपाची ताकद फक्त गोमुत्र राज्ये जिंकण्यापुरतीच,” द्रमुकच्या खासदाराचं वादग्रस्त विधान

या विधानानंतर द्रमुक खासदार सेंथिलकुमार एस यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

D N V Senthilkumar
खासदार सेंथिलकुमार एस यांनी लोकसभेत बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. ( स्क्रिनग्रॅब छायाचित्र )

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी द्रविड मुन्नेत्र कळघम ( डीमके ) खासदार डी.एनव्ही सेंथिलकुमार एस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाची ताकद फक्त आम्ही गोमुत्र राज्य म्हणतो ती हिंदी राज्ये जिंकण्यापुरतीच आहे, असं सेंथिलकुमार एस यांनी म्हटलं. या विधानानंतर सेंथिलकुमार एस यांच्यावर सर्व स्तरातून टीकास्र डागलं जात आहे.

सेंथिलकुमार एस काय म्हणाले?

जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयकांवरील चर्चेत सेंथिलकुमार एस यांनी भाग घेतला. तेव्हा बोलताना सेंथिलकुमार एस म्हणाले, “देशातील जनतेनं विचार केला पाहिजे की, भाजपाची ताकद फक्त हिंदी पट्ट्यातील राज्ये जिंकण्यापुरतीच आहे. ज्याला आम्ही गोमुत्र राज्ये म्हणून संबोधतो. तुम्ही ( भाजपा ) दक्षिण भारतात येऊ शकत नाही. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात काय झालं, हे सर्वांनी पाहिलंच आहे. आम्ही तिथे खूप मजबूत आहोत.”

AAP and Congress will fight together
आप आणि काँग्रेस दिल्लीत भाजपाविरोधात एकत्र लढणार, पण गुजरात, आसाम अन् गोव्याचे काय?
maval lok sabha seat
पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा
Loksabha Election 2024
लोकसभा स्वबळावर लढण्याच्या ‘आप’च्या निर्णयानंतर काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू; इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढणार?
kalyan local workers decision not put shiv sena leaders and office bearers photo on bjp hoarding
कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या फलकांवरून यापुढे शिवसेना नेते, पदाधिकारी बाद? भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा निर्णय

एमडीएमके ( मारूमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम ) खासदार वायको यांनी सेंथिलकुमार एस यांच्या विधानाचं समर्थन केलं. “मी सेंथिलकुमार एस यांच्या विधानाशी सहमत आहे,” असं वायको यांनी सांगितलं.

भाजपा खासदार जगन्नाथ सरकार यांनी सेंथिलकुमार एस यांच्या वक्तव्यावर टीका केली. “भाजपाला देशाभरात स्विकारलं आहे. जो कुणी अशी वक्तव्य करत आहे, त्याला काहीच माहिती नाही. जनतेचा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. पंतप्रधान मोदी हे फक्त भारतीय नाही तर जागतिक नेते बनले आहेत.”

काँग्रेस खासदार कार्ति पी. चिंदबरम यांनी सेंथिलकुमार एस यांच्या विधानाला असंसदीय म्हटलं आहे. “अत्यंत असंसदीय भाषा वापरण्यात आली. सेंथिलकुमार एस यांनी तातडीने माफी मागत विधान मागे घ्यावे,” असं कार्ति चिंदबरम म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dmk mp d n v senthilkumar said bjp winning elections of hindi gaumutra states ssa

First published on: 05-12-2023 at 21:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×