scorecardresearch

कंडोमच्या पाकिटावरील छायाचित्रे कायद्याचे उल्लंघन करतात का; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

कंडोमच्या पाकिटांवरील या जाहिरांतीवर कारवाई करावी किंवा करू नये, हे तुम्ही आम्हाला सांगा.

neet, medical entrance exam
याच आठवड्यात मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नीट संदर्भात काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर लगेचच या निर्णयाच्याविरोधात असलेल्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कंडोमच्या पाकिटावरील छायाचित्रे अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अतिरिक्त महाधिवक्ता मणिंदर सिंग यांना आता पुढील सहा आठवडे कंडोमची पाकिटे, गर्भनिरोधक साधने आणि अन्य लैंगिक गरजांशी संबंधित उत्पादनांची पाहणी करावी लागणार आहे. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने मंगळवारी मणिंदर सिंग यांना याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले. कंडोमच्या पाकिटांवरील या जाहिरांतीवर कारवाई करावी किंवा करू नये, हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यासाठी या जाहिरांतीचे परीक्षण करा आणि आम्हाला तुमची भूमिका कळवा, असे खंडपीठाने महाधिवक्त्यांना सांगितले.
या जाहिराती अश्लिलतेसंबंधीच्या मर्यादा आणि कायद्याचे उल्लंघन करतात का याची पाहणी करा. तसे असल्यास या जाहिरातींचे नियमन करण्यासाठी तुमच्याकडे योजना आहे का? कंडोमच्या या पाकिटांवर काय छापले जाते, हे तुम्ही तपासू शकता का किंवा बाजारात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता, यासंबंधीचे स्पष्टीकरण अहवालात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हिंदुस्तान लॅटेक्स आणि अन्य कंडोम उत्पादकांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-04-2016 at 09:48 IST

संबंधित बातम्या