बिहारमध्ये दोन ठिकाणी डॉक्टरांना बेदम मारहाण

मधेपुरा येथे एका पोलीस अधिकाऱ्याने अतिरिक्त प्राथमिक केंद्रातील डॉक्टरला मारहाण करण्याची घटना घडली.

राजदच्या आमदारपुत्राने आणि एका पोलीस अधिकाऱ्याने गया आणि मधेपुरा येथे दोघा डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी डॉक्टरांनी मधेपुरा येथे संपाचे हत्यार उपसले.
गया येथे राजदच्या आमदार कुंतीदेवी यांच्या पुत्राने नीमचाक बाथनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरला बुधवारी मारहाण केली. आमदारपुत्र रणजित यादव यांनी डॉक्टर सत्येंद्रकुमार सिन्हा यांना हजेरीपट दाखविण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांनी हजेरीपट न दाखविल्याने सिन्हा यांना मारहाण करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.
मधेपुरा येथे एका पोलीस अधिकाऱ्याने अतिरिक्त प्राथमिक केंद्रातील डॉक्टरला मारहाण करण्याची घटना घडली. सदर डॉक्टर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उशिरा आल्याने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर डॉक्टरचे नाव श्रवणकुमार असे असून कृत्यानंद पासवान या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना मारहाण केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doctor untenable assaulted in bihar