Donald Trump aide Peter Navarro warns India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी सोमवारी भारताला गंभीर इशारा दिला आहे. भारताला व्यापारासंबंधी चर्चेसाठी फिरून अमेरिकेकडे यावेच लागले अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे नवारो म्हणाले आहेत. रिअल अमेरिकाज व्हॉइसमध्ये बोलताना, नवारो यांनी नवी दिल्लीवर ‘महाराजा ऑफ टॅरिफ’ या प्रतिमेच्या आड दडल्याचा आरोप केला आणि भारताचे रशियाबरोबर उर्जा क्षेत्रात वाढत असलेले संबंधांचा शेवट चांगला होणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

“जगातील कोणत्याही प्रमुख देशाच्या तुलनेत त्यांनी अमेरिकेविरोधात सर्वाधिक टॅरिफ लावले आहेत. आपल्याला त्याचा सामाना करावा लागेल,” असे नवारो म्हणाले. तसेच युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी भारताने खूप कमी प्रमाणात रशियाकडून तेल खेरदी केले, पण आता स्वस्त रशियन कच्च्या तेलातून फायदा मिळवत आहेत. “अमेरिकन करदात्यांना या संघर्षासाठी अधिक पैसा पाठवावा लागत आहे,” असा दावा देखील त्यांनी केला

नवारो यांनी भारताच्या स्थितीची अमेरिकेचे सहकारी देश जसे की युरोपियन यूनियन, जपान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया यांच्याशी केली. हे देश व्यापार कराराच्या माध्यमातून अमेरिकेच्या जवळ आले आहेत असे नवारो म्हणाले. “मला वाटते की भारताला कधीतरी जुळवून घ्यावेच लागेल. आणि जर त्यांनी घेतले नाही तर तो रशिया आणि चीनच्या बाजूने असेल आणि त्याचा शेवट भारतासाठी चांगला होणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नवारो यांनी भारताकडून होणारी ऊर्जा आयतीचा मुद्दा जागतिक सुरक्षेशी जोडला. “भारताला रशियन ऑइल खरेदी करणे थांबवावे लागेल. शांततेकडे जाणारा मार्ग काही प्रमाणात नवी दिल्लीतून जातो,” असा दावा त्यांनी केला. अमेरिकेच्या आरोपांनंतर युरोपातून रशियन कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्यात आली आहे. चीनबद्दल बोलताना नवारो म्हणाले की, अमेरिकेने चिनी मालाच्या आयातीवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त टॅरिफ लादला आहे.

ते पुढे म्हणाले, “जेव्हा ते अमेरिकेला माल विकतात, तेव्हा त्यांची निर्यात, त्यांच्या अन्यायकारक व्यापार पद्धतींनी आमचे रक्त शोषून घेणाऱ्या पिशाच्यांसारखी (Vampires) असते.” या वरिष्ठ सल्लागाराने असाही आरोप केला की, BRICS सदस्य “ऐतिहासिकदृष्ट्या एकमेकांचा द्वेष करतात आणि एकमेकांना मारतात,” आणि अमेरिकेशी व्यापार नसल्यास हा गट टिकणार नाही, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. तसेच त्यांनी आरोप केला की, BRICS सदस्य ऐतिहासिकदृष्टया एकमेकांचा द्वेष करतात आणि एकमेकांची हत्या करतात. तसेच त्यांनी अमेरिकन व्यापाराशिवाय हा गट टीकणार नाही, असेही नवारो यावेळी म्हणाले.