अमेरिकेतील आयबीएम या कंपनीने मिनियापोलिस येथे किमान ५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले व त्या नोकऱ्या भारत व इतर देशांना दिल्या, असा आरोप अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मी जर निवडून आलो तर नोकऱ्या परदेशात नेणाऱ्या कंपन्यांवर ३५ टक्के कर आकारीन असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयबीएम कंपनीने मिनियापोलिस येथील ५०० कर्मचारी काढून टाकले व त्या नोकऱ्या भारत व इतर देशात नेल्याय आमचे प्रशासन नोकऱ्या परदेशातील लोकांना मिळू देणार नाही किंवा नोकऱ्या देशाबाहेर जाऊ देणार नाही. मिनेसोटातील नोकऱ्याही देशाबाहेर जाऊ देणार नाही, असे त्यांनी मिनियापोलिस येथील सभेत सांगितले. मिनेसोटा हा डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. जर एखादी कंपनी मिनेसोटा सोडून जाणार असेल व कर्मचाऱ्यांना काढणार असेल, दुसऱ्या देशात उत्पादन करणार असेल, तर त्यांच्यावर ३५ टक्के कर लावला जाईल. अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रातही आम्ही मोठे बदल करू. मिनेसोटातील शेतकरी, कामगार व छोटय़ा उद्योगांवर ओबामांनी लादलेले र्निबध मी दूर करीन. आम्ही पुन्हा श्रीमंत देश होऊ, त्याचबरोबर सुरक्षित देश असल्याचे सिद्ध करून दाखवू असे ते म्हणाले. हिलरी क्लिंटन यांना सीरियन शरणार्थीचे प्रमाण ५५० टक्के वाढवायचे आहे, त्यांना अर्निबध स्थलांतर हवे आहे, हे स्थलांतरित जगातील घातक अशा देशातून येत आहेत, अशी टीका करून त्यांनी सांगितले, की त्या दहशतवाद व मूलतत्त्ववाद आयात करीत आहेत. मी अध्यक्ष झालो तर सीरिया शरणार्थी कार्यक्रम रद्द  करीन, मूलतत्त्ववादी इस्लामी दहशतवाद्यांना थारा देणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump commented on us jobs
First published on: 08-11-2016 at 01:48 IST