‘वर्ल्ड लीडर्स ऑन फेसबुक’ या बर्सन कॉन अँड वुल्फच्या अहवालात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबुकवरील लोकप्रिय नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले आहे. फेसबुकवर मोदी यांना ४३.२ दशलक्ष अनुसारक आहेत. ट्रम्प यांचे समाजमाध्यमांवर अधिराज्य असतानाही ते दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून त्यांना २३.१ दशलक्ष अनुसारक आहेत, असे ‘वर्ल्ड लीडर्स ऑन फेसबुक’ या बर्सन कॉन अँड वुल्फच्या अहवालात म्हटले आहे. या अभ्यासात एकूण ६५० राष्ट्रप्रमुख व परराष्ट्रमंत्री यांच्या फेसबुक पानांचा अभ्यास १ जानेवारी २०१७ पासून करण्यात आला.

फेसबुकच्या क्राउड टँगल टूलच्या मदतीने नेमके किती अनुसारक या नेत्यांना मिळाले आहेत, याची माहिती घेण्यात आली. गेल्या चौदा महिन्यांत ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवर जास्त घडामोडी दिसल्या. एकूण २०४.९ दशलक्ष क्रिया (कमेंट, लाइक्स, शेअर्स) त्यात दिसून आल्या. मोदी यांच्या फेसबुक पेजवर ११३.६ दशलक्ष आंतरसंवादक्रिया दिसून आल्या. मोदी यांनी समाजमाध्यमांच्या वापरास प्राधान्य दिले असून ते त्या माध्यमातूनच लोकांच्या संपर्कात आहेत.

इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या पेजवर ४६ आंतरसंवाद क्रिया आहेत तर कंबोडियाचे पंतप्रधान समदेच हून सेन तर अर्जेटिनाचे अध्यक्ष मॉरिसियो मॅक्रि यांच्या फेसबुक पेजवर ३६ व ३३.४ दशलक्ष आंतरसंवाद क्रिया आहेत.

संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या १९३ पैकी ९१ टक्के म्हणजे १७५ देशांचे फेसबुक पेज आहे. १०९ राष्ट्रप्रमुख ८६ सरकार प्रमुख व ७२ परराष्ट्रमंत्री यांचे व्यक्तिगत फेसबुक पेज आहेत. जागतिक नेत्यांसाठी फेसबुक हा प्रभावी मंच असून सरकारे त्याच्या माध्यमातून मतदार, समर्थक व नागरिक यांच्या संपर्कात असतात. १५ मार्च २०१८ अखेर जागतिक नेत्यांची एकूण फेसबुक पेज पाहिली असता सगळ्यांचे मिळून ३०९.४ दशलक्ष अनुसारक आहेत. १ जानेवारी २०१७ अखेर एकूण ५,३६,६४४ पोस्टस टाकण्यात आल्या तर एकूण ९०० दशलक्ष आंतरसंवाद क्रिया झाल्या. निम्म्या पोस्टमध्ये छायाचित्रांचा समावेश असून काहींमध्ये व्हिडिओ व चर्चा प्रसारित केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump facebook narendra modi
First published on: 03-05-2018 at 01:19 IST