US Tariffs on Countries List : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात शुल्काची (टॅरिफ) आजपासून (७ ऑगस्ट) अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमेरिकेने ९० हून अधिक देशांवर टॅरिफ लागू केलं आहे. दरम्यान, मध्यरात्री ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मध्यरात्र झाली आहे. आता अब्जावधी डॉलर्स अमेरिकेत येत आहेत.” दरम्यान, भारतावर लागू करण्यात आलेला २५ टक्के इतका आयात कर देखील लागू करण्यात आला आहे. तसेच ट्रम्प यांनी भारताला आणखी २५ टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. २७ ऑगस्टपासून हे आयात शुल्क लागू केलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशिया-युक्रेन युद्धात रशियाला वित्तपुरवठा करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तसेच ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिकेत आयात होणाऱ्या सेमीकंडक्टर्सवर पुढील काळात १०० टक्के आयात शुल्क लावण्याच्या विचारात आहोत.

अमेरिकेने आयात शुल्क लादलेल्या देशांची यादी

क्र.देशआयात शुल्क (टक्क्यांमध्ये
अफगाणिस्तान१५%
अल्जेरिया३०%
अंगोला१५%
बांगलादेश२०%
बोलिव्हिया१५%
बोस्निया आणि हर्जेगोव्हिना३०%
बोत्सवाना१५%
ब्राझील१०%
ब्रुनेई२५%
१०कंबोडिया१९%
११कॅमेरून१५%
१२चाड१५%
१३कोस्टा रिका१५%
१४आयव्हरी कोट१५%
१५काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक१५%
१६इक्वेडोर१५%
१७युरोपियन युनियन१ ते १५%
१८इक्वेटोरियल गिनी१५%
१९फॉकलन्ड बेटे१०%
२०फिजी१५%
२१घाना१५%
२२गयाना१५%
२३आइसलँड१५%
२४भारत२५%
२५इंडोनेशिया१९%
२६इराक३५%
२७इस्रायल१५%
२८जपान१५%
२९जॉर्डन१५%
३०कझाकस्तान१५%
३१लाओस२५%
३२लेसोथो१५%
३३लिबिया३०%
३४लिकटेंस्टाईन१५%
३५मादागास्कर१५%
३६मलावी१५%
३७मलेशिया१९%
३८मॉरिशस१५%
३९मोल्दोव्हा२५%
४०मोझांबिक१५%
४१म्यानमार (ब्रह्मदेश)४०%
४२नामिबिया१५%
४३नौरू१५%
४४न्यूझीलंड१५%
४५निकाराग्वा१८%
४६नायजेरिया१५%
४७उत्तर मॅसेडोनिया१५%
४८नॉर्वे१५%
४९पाकिस्तान१९%
५०पापुआ न्यू गिनी१५%
५१फिलीपिन्स१९%
५२सर्बिया३५%
५३दक्षिण आफ्रिका३०%
५४दक्षिण कोरिया१५%
५५श्री लंका२०%
५६स्वित्झर्लंड३९%
५७सीरिया४१%
५८तैवान२०%
५९थायलंड१९%
६०त्रिनिदाद आणि टोबॅगो१५%
६१ट्युनिशिया२५%
६२तुर्की१५%
६३युगांडा१५%
६४युनायटेड किंग्डम१०%
६५वानुआतू१५%
६६व्हेनेझुएला१५%
६७व्हिएतनाम२०%
६८झांबिया१५%
६९झिम्बाब्वे१५%