अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्यांची व उताराची तीव्र भीती (फोबिया) असल्यामुळे इंग्लंड दौऱ्यादरम्यान पायऱ्यांचा वापर टाळण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्या चढण्याची भीती असल्याच्या बातम्या समोर आल्याने अशा प्रकारचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘दी संडे टाइम्स’ वृत्तपत्राने दिली आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजक सर्व कार्यक्रम इमारतींच्या तळमजल्यावर ठेवणार असून पायऱ्यांचा कमीत कमी वापर करणार आहेत. त्याचप्रमाणे ट्रम्प यांच्यासाठी विशेष मार्गिका तयार करण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्हाइट हाऊसला भेट दिली होती तेव्हा उतरणीवर ट्रम्प यांनी मे यांचा हात पकडल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर याबाबत बैठका झाल्या ज्यात ट्रम्प यांना पायऱ्या वापरणे आवडत नसल्याचे समोर आले आहे. दौऱ्यादरम्यान पायऱ्यांचा वापर पूर्णपणे टाळणे अशक्य असल्याने त्यांचा कमीत कमी वापर करण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्रानेदेखील ट्रम्प यांना पायऱ्या चढणे आवडत नसल्याची माहिती दिली होती.

 

Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
mumbai university fake marksheet marathi news
कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाकडून पोलीस तक्रार दाखल
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
ai technology marathi crime news
“मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय..”, AI चा वापर करून ५८ वर्षीय महिला प्राध्यापिकेची फसवणूक; १ लाखांचा गंडा!

सत्तेतील १०० दिवसांनिमित्त ट्रम्प यांची पेनसिल्व्हानियात भव्य मिरवणूक

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सत्तेत १०० दिवस पूर्ण झाल्यावर पेनसिल्व्हानियात भव्य मिरवणूक आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.

येत्या २९ एप्रिलला त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून १०० दिवस होत आहेत. ट्रम्प यांनी यासंबंधी ट्वीट केले आहे. याच दिवशी व्हाइट हाऊस पत्रकार संघटनेचा वार्षिक भोजन समारंभही आहे. आजवर शक्यतो सर्व अध्यक्ष या समारंभाला उपस्थिती लावत आले आहेत. मात्र प्रसारमाध्यमांनी आपल्याबाबत एकांगी वार्ताकन केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी या समारंभावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले होते. ट्रम्प यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवत या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याचे घोषित केले होते. मात्र १०० दिवसांचा कार्यकाळ झाल्याबद्दल पेनसिल्व्हानिया फार्म शो कॉम्प्लेक्स आणि हॅरिसबर्ग येथील एक्स्पो सेंटर योथे मिरवणूक आयोजित केली जाणार आहे.

खुल्या व्यापारावर विश्वासाचे अमेरिकी अर्थमंत्र्यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन : रोजगार व व्यापारात बचावात्मक व संकुचित भूमिका घेणाऱ्या अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन मुशिन यांनी खुल्या व्यापारावर अमेरिकेचा विश्वास असल्याचे वक्तव्य केले आहे, जे त्या देशाची कृती व बोलणे यातील विरोधाभास स्पष्ट करणारे आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांनी जो कार्यक्रम आखला आहे तो खुल्या व सौहार्दपूर्ण व्यापारास अनुकूल आहे. अमेरिका ही खुल्या व्यापारासाठी मोठी बाजारपेठ आहे त्यात सेवा, वस्तू व गुंतवणूक या सगळ्यांचा समावेश आहे. अमेरिका इतरांना ज्या पद्धतीने वागवते तीच वागणूक इतरांकडून अमेरिकेला अपेक्षित आहे. आम्ही खुला व्यापार करतो त्यामुळे आम्हाला जगाकडून तशाच प्रतिसादाची अपेक्षा आहे असे ट्रम्प यांचे मत आहे. मुशिन यांचे हे वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीन लॅगार्ड यांच्या टीकेनंतरचे आहे. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रवादी आíथक कार्यक्रम राबवला असून त्यात आतापर्यंतचे व्यापार धोरण बदलून जुने व्यापार करार पुन्हा नव्याने फेरवाटाघाटीने करणे, इतर देशांच्या मालावर शुल्क लादणे, द्विपक्षीय करार करणे अशा उपाययोजना केल्या आहेत. गेल्या महिन्यात जी २० अर्थमंत्र्यांच्या बठकीत जर्मनीमध्ये बचावात्मक धोरणांना विरोध करण्यात आला होता. त्याच बचावात्मक या शब्दाचा उल्लेखही टाळण्यात आला. जर आमच्या बाजारपेठा खुल्या असतील तर इतरांनीही तसाच प्रतिसाद दिला पाहिजे असे मुशिन यांनी सांगितले. इतर देशांनी आयात कर वाढवले आहेत ते खुल्या व्यापाराचे लक्षण नाही असे ते म्हणाले.