चीनमध्ये मुलांच्या वाईट सवयी आणि गुन्ह्यांना आता पालकांच्या संस्काराला जबाबदार धरलं जाणार आहे. तसेच यासाठी पालकांना विशिष्ट प्रकारची शिक्षाही दिली जाणार आहे. चीन सरकारने याबाबत एक कायद्याचा मसुदा तयार केला आहे. लवकरच या प्रस्तावित विधेयकाला मंजूरी देऊन त्याचं कायद्यात रुपांतर करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांबाबत पालकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या कायद्याप्रमाणे पालकांना नेमकी काय शिक्षा होणार?

चीनमधील या नव्या प्रस्तावित कायद्याप्रमाणे एखाद्या पालकांच्या पाल्यानं वाईट वर्तन केलं किंवा काही गुन्हा केला, तर याला पालकांच्या संगोपनाला जबाबदार धरलं जाणार आहे. पालकांनी योग्य वळण न लावल्यानं आणि योग्य काळजी न घेतल्यानंच त्या मुलानं ती चुकीची कृती किंवा गुन्हा केला असा अर्थ काढला जाणार आहे. तसेच यात दोषी सिद्ध झाल्यास संबंधित पालकांना चीनच्या शिक्षण मंत्रालयानं विकसित केलेल्या “कुटुंब शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमा”ला सामोरं जावं लागेल.

पालकांना शिक्षा देण्यामागं चीन सरकारची भूमिका काय?

चीनच्या कायदा आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, “किशोरवयातील मुलांनी चुकीचं वर्तन करायला खूप कारणं असतात. त्यात कुटुंबात योग्य संगोपन न करणं हे मोठं कारण आहे. पालकांनी आपल्या पाल्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि त्यांच्यासोबत आराम करणं, खेळणं आणि अभ्यास घेणं अशा कृती केल्या पाहिजे.”

हेही वाचा : भारताकडून पाकिस्तान आणि चीनला दिल्लीत बैठकीचं आमंत्रण, कारण काय?

सुट्टीच्या दिवशी मुलांच्या गृहपाठात मोठी कपात

नुकतेत चीनच्या शिक्षण मंत्रालयाने मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्यावर निर्बंध लादले. नव्या नियमांनुसार मुलांना केवळ शुक्रवार, शनिवार आणि रविवारीच १ तास ऑनलाईन गेम खेळता येणार आहेत. तसेच साप्ताहिक सुट्टी आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी मुलांना दिल्या जाणाऱ्या गृहपाठात देखील कपात करण्यात आलीय. मुलांवर अधिकच्या गृहपाठाचा विपरीत परिणाम होतो यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Draft of New law in China to punish parents for their children’s bad behavior and crime

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Draft of new law in china to punish parents for their childrens bad behavior and crime pbs
First published on: 19-10-2021 at 20:40 IST