अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. पूर्व कामेन्ग जिल्ह्यात सोमवारी या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कामेन्गमधील सेप्पा ते चायान्ग ताजो या मार्गावर ही सेवा कार्यरत असणार आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या सेवेचा ५० सेकंदांचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

5G ची प्रतीक्षा लवकरच संपणार; पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान सांगितली मोठी गोष्ट

“भारताला जगातील ड्रोन हब बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अरुणाचल प्रदेश सरकारने आरोग्य सेवा, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (WEF) सहकार्य लाभले आहे”, अशी माहिती ट्वीट करत मुख्यमंत्री खांडू यांनी दिली आहे.

या प्रकल्पासाठी युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने(USAID) निधी दिला आहे. बंगळुरूच्या ‘रेडविंग लॅब्स’ या स्टार्टअपद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे आरोग्यसेवेतील समस्या, आर्थिक व्यवहार्रता यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यावर आधारीत धोरण सरकार तयार करेल. त्यानंतर टप्पाटप्प्याने ही सेवा संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्यासाठी पाऊलं उचलेल, असे खांडू यांनी म्हटले आहे.

..नाहीतर पूर्ण दिवस मोफत देऊ हाय- स्पीड इंटरनेट! तुमची Router कंपनी देतेय का ‘ही’ सेवा?

सध्या पूर्व कामेन्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकल्पाला ‘समरिद्धी’ या आरोग्य सेवेशी संबंधित संस्थेने देखील आर्थिक आणि तांत्रिक मदत केली आहे. पूर्व कामेन्ग जिल्हा डोंगराळ भागात वसलेला आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यास प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषत: पावसाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होत होती. ही समस्या सोडवण्यासाठी आता सरकारकडून ड्रोन यंत्रणेची मदत घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू झालेली ही ड्रोन सेवा ‘गेम चेंजर’ ठरेल, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे उपायुक्त प्राविमल अभिषेक यांनी दिली आहे. “आंतरराष्ट्रीय संस्थानी २०२१ मध्ये अरुणाचल प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला होता. या राज्यातील आरोग्य वितरण प्रणाली, रोगांच्या स्वरुपासह समस्या या संस्थानी जाणून घेतल्या होत्या”, अशी माहिती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतराळ आणि ड्रोन यंत्रणेचे प्रमुख विग्नेश संथानाम यांनी दिली. सेप्पा-बामेन्ग रस्त्यावर प्रवास करताना या भागाला ड्रोन यंत्रणेची नितांत गरज आहे, असे जाणवल्याचे संथानाम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone based medical and healthcare network started in east kameng arunachal pradesh rvs
First published on: 16-08-2022 at 10:04 IST