४० कोटींचे अमलीपदार्थ, १० कोटींवर रोकड, ३९१ अवैध शस्त्र हस्तगत

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेच्या काळात १९ हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच या काळात ४० कोटी रुपये किंतमीचे अंमलीपदार्थ, १० कोटी रुपयांची रोकड आमि ३९१ अवैध शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.  प्रतिबंधात्मक कारवायांची कठोर अंमलबजावणी केल्याने लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी शहरात शांततापूर्ण आणि मोकळ्या वातावरणात मतदान पार पडेल, असा दावा शनिवारी मुंबई पोलिसांनी केला.

मुंबई पोलिसांनी शनिवारी जारी केलेल्या माहितीनुसार, आचारसंहितेच्या काळात शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १९ हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी २०४ जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले.  आठ हजार गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांकडून फौजदारी दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार हमीपत्र घेण्यात आले.  पाच हजारांहून अधिक जणांना नोटीसा धाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

५० हजार पोलीस तैनात

येत्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी शहर पोलीस दलातील ४० हजार ४०० मनुष्यबळ  बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबत निमलष्करी दलाच्या १४ तुकडय़ा, राज्य राखीव दलाच्या १२ तुकडय़ा आणि सहा हजार होमगार्ड पोलीस मनुष्यबळाच्या जोडीला बंदोबस्त ठेवणार  आहेत, असे पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी स्पष्ट केले.

३२५ मतदान केंद्र संवेदनशील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर, उपनगरांतील सहा मतदारसंघातील १४९२ मतदान केंद्रांमधील १००७३ बुथवर मतदान होणार आहे. मुंबईच्या शहर जिल्’ात दोन मतदारसंघ असून ५२७ मतदान केंद्र, २६०१ बुथ तर उपनगर जिल्’ात चार मतदारसंघ असून ९६५ मतदान केंद्र, ७४७२ बुथ आहेत. शहर, उपनगर जिल्’ांतील एकही मतदान केंद्र असुरक्षित नाही, असा दावा पोलिसांनी केला. मात्र निवडणूक आयोगाच्या विविध निकषांमुळे ३२५ केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी ६० उपनगरातील तर उर्वरित शहरातील केंद्र असल्याचे सांगण्यात आले.