* दुबईच्या जेबेल अली गावात बांधण्यात आलेले हिंदू मंदिर बुधवारी, दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांसाठी खुले करण्यात आले. भारतीय आणि अरेबिक स्थापत्यकलेचे मिश्रण असलेल्या या मंदिराची रचना २०१९ मध्ये करण्यात आली होती. दोन वर्षांत ते बांधून पूर्ण करण्यात आले.

* सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि भारताचे यूएईतील राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हे मंदिर सहिष्णुता, शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक असेल, असे यावेळी नाहयान आणि सुधीर यांनी सांगितले.

* यूएईमध्ये ३५ लाख भारतीय असून या देशांत हिंदू मंदिर बांधण्याची त्यांची इच्छा होती. ही इच्छ यूएई सरकारने पूर्ण केल्याबद्दल सुधीर यांनी आभार मानले.

* ७० हजार चौरस फुटांत हे मंदिर विस्तारले असून हे मंदिर खुले केल्यानंतर पुजाऱ्यांनी ‘ओम् शांती ओम्’चा जयघोष करत भाविकांचे स्वागत केले. यावेळी तबला आणि ढोल वाजवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* या मंदिरात १६ देवी-देवतांच्या मूर्ती असून एकाच वेळी हजारो भाविक या मंदिराला भेट देऊ शकतात. * जेबेल अली हे गाव सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात सात चर्च, एक गुरुद्वार आणि आता नवे हिंदू मंदिर आहे.