फॉक्सवॅगन- एजी आणि त्यांची चीनची सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन चीनमधून ४८ लाख कार परत मागवणार आहे. सदोष एअरबॅग्जमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एअरबॅग बनवणारी कंपनी टकाटा कॉर्पोरेशन दिवाळखोरीत निघाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी चीनमधील वाहनांची निगराणी करणाऱ्या संस्थेने जर्मनीची कंपनी जनरल मोटर्स आणि मर्सिडीज कंपनीला त्यांनी ज्या कारसाठी टकाटा कंपनीच्या एअरबॅग्ज वापरल्या आहेत. त्या रिकॉल करण्याचा आदेश दिला होता. या संस्थेच्या मते, चीनमध्ये सुमारे २९ लाख कारमध्ये टकाटा एअरबॅग्जचा वापर करण्यात येत आहे. या एअरबॅग्जमुळे आतापर्यंत सुमारे १६ लोकांचा मृत्यू तर १८० जण जखमी झाले आहेत.

चीनच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ क्वॉलिटी सुपरव्हिजन, इन्स्पेक्शन अँड क्वारेंटाइनने (एक्यूएसआयक्यू) म्हटले आहे की, फॉक्सवॅगन चीनमधील एकूण १,०३,५७३ कार, एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन २३.५ लाख कार आणि एसएआयसी- फॉक्सवॅगन एकूण २४ लाख कार परत मागवणार आहे. या संस्थेच्या माहितीनुसार, रिकॉलची ही प्रक्रिया पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होईल आणि २०१९ पर्यंत ती राहील. दरम्यान, सुमारे ३७ कंपन्या टकाटा एअरबॅग्जचा वापर करतात. यातील २४ कंपन्यांनी सुमारे १ कोटी कार रिकॉल केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to defective airbags volkswagen will recall about 50 lakh cars in china
First published on: 14-09-2017 at 16:50 IST