scorecardresearch

रशिया युक्रेन युद्धामुळे इंधनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ; ब्रिटनसह अनेक देशांकडून नागरिकांसाठी मदतीची घोषणा

वाढणारी ऊर्जा बिले भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी ब्रिटनने १५ अब्ज पाऊंडचे पॅकेज जाहीर केले आहे.

russia ukraine

जगण्याच्या संकटात वाढणारी ऊर्जा बिले भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी ब्रिटनने १५ अब्ज पाऊंडचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधील २५ टक्के रक्कम तेल आणि वायू उत्पादकांच्या नफ्यावरील करातून येणार आहे. गुरुवारी, ब्रिटनने संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हे पॅकेज जाहीर केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युरोपीय देशांमधील ऊर्जेच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.

सर्व घरगुती ग्राहकांना ऊर्जा बिलांवर ४०० पाऊंड सूट मिळेल. याशिवाय, सर्वात कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अतिरिक्त पाऊंड ६५० ची मदत दिली जाईल. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सांगितले की, नव्या घोषणांनंतर सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा आकडा ३७ अब्ज पाऊंडवर पोहोचला आहे.

ब्रिटनचे अर्थमंत्री सुनक यांनी संसदेला सांगितले की, “आम्ही तात्पुरती आणि लक्ष्यित ऊर्जा लाभ आकारणी लागू करू, परंतु आम्ही नवीन गुंतवणूक भत्ता तयार केला आहे ज्याचा अर्थ कंपन्यांना त्यांच्या नफ्याची पुनर्गुंतवणूक करावी लागेल. एक नवीन आणि महत्त्वाची प्रेरणा असेल कंपनी जितकी जास्त गुंतवणूक करेल तितका कमी कर भरेल.”

तसेच बल्गेरियाने ही मे महिन्याच्या सुरुवातीला १.१ बिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केले. युक्रेन युद्धामुळे संकटात सापडलेल्या कंपन्या आणि कुटुंबांना ऊर्जा आणि अन्नाच्या किमतींपासून दिलासा देण्याची योजना आहे. सरकारने या वर्षाच्या अखेरीपर्यंत पेट्रोल, डिझेल, मिथेन आणि पेट्रोलियम गॅसवर सुमारे १३ सेंट प्रति लिटर सवलत जाहीर केली. यासोबतच मिथेन, वीज आणि नैसर्गिक वायूवरील उत्पादन शुल्कही हटवण्यात आले आहे.

डॅनिश खासदारांनी हीट चेक नावाची नवीन योजना मंजूर केली आहे. या अंतर्गत सुमारे ४१९,००० कुटुंबांना २८८ दशलक्ष डॉलर अनुदान दिले जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to the russia ukraine war aid for citizens from many european countries including britain abn

ताज्या बातम्या