अफगाणिस्तानातील हिंदुकुश भागात मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. उत्तर भारतात जन्मू-काश्मीर आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी हा धक्का जाणवला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू १७० किमी खोल होता. त्याची तीव्रता ५.८ रिश्टर होती. यात मालमत्ता किंवा प्राणहानीचे वृत्त नाही. दुपारी २.०७ वाजता दिल्लीत धक्के जाणवले, त्यामुळे लोक घराबाहेर पळाले. दुपारी सव्वादोन वाजता काश्मीर खोऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र हिंदुकुश पर्वतराजीत १७० किमी खोलीवर होते. काही सेकंद हा धक्का जाणवला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की भूकंपामुळे नुकसानीचे वृत्त नाही.