scorecardresearch

२००८ ची आर्थिक आपटी अचूक वर्तवणारे अर्थतज्ज्ञ म्हणतात ‘दोन वर्ष जगाचं काही खरं नाही’!

चालू वर्षाखेरीस सुरू होणारी आर्थिक मंदी २०२३ अखेरपर्यंत चालेल – रुबिनी यांचं भाकित!

२००८ ची आर्थिक आपटी अचूक वर्तवणारे अर्थतज्ज्ञ म्हणतात ‘दोन वर्ष जगाचं काही खरं नाही’!
अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांचा जगभरातल्या देशांना गंभीर इशारा!

करोना काळात जागतिक स्तरावर सर्वच देशांमध्ये आर्थव्यवस्था संकटात सापडल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून करोनामधून काहीशी उसंत मिळाल्यानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सावरताना पाहायला मिळत आहेत. मात्र, आत्ता कुठे करोनाचं संकट निवळलं असतानाच एक नवं संकट जगावर ओढवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. पुढची दोन वर्ष जागतिक पातळीवर भीषण आर्थिक संकट ओढवू शकतं, असा अंदाज अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांनी व्यक्त केला आहे. रुबिनी यांनीच २००८ साली जागतिक मंदीबाबत अचूक भाकित केलं होतं. त्यामुळे, यावेळी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे जगभरातील सरकार आणि प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

काय म्हणाले रुबिनी?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबिनी यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. त्यांच्यामते, पुढील दोन वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या शेवटपर्यंत अमेरिका आणि जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये दीर्घकाळ चालणारी आणि भीषण अशी आर्थिक मंदी येऊ शकते. आर्थिक संकटाचा हा काळ तब्बल वर्षभर म्हणजे २०२३च्या अखेरपर्यंत चालू राहू शकतो. याचा मोठा परिणाम S&P 500 वरही दिसून येईल. साध्या मंदीमध्येही S&P 500 तब्बल ३० टक्क्यांनी घसरू शकते. शेअर बाजारात ४० टक्के घसरण दिसू शकते, असं भाकित रुबिनी यांनी केलं आहे.

विश्लेषण : शेअर बाजाराप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसी धारकांना डीमॅट खाते अनिवार्य होणार?

‘डॉक्टर डूम’ यांचं भाकित!

२००७ ते २००८ या काळातील आर्थिक संकटाचं अचूक भाकित केल्यामुळे नॉरियल रुबिनी यांचं नाव ‘डॉक्टर डूम’ असं पडलं. या आर्थिक संकटाला गांभीर्याने न घेणाऱ्यांना त्यांनी इशाराही दिला आहे. ज्यांना या आर्थिक मंदीचा फटका फारसा बसणार नाही असं वाटतंय, त्यांनी वेगवेगळ्या सरकारांवर आणि कॉर्पोरेशन्सवर असलेल्या कर्जाचा भार एकदा पाहावा, असं ते म्हणाले आहेत. जसजसे कर्जदर वाढतील तसतसा त्याचा संस्थांना, जनसामान्यांना, कॉर्पोरेट क्षेत्राला, बँकांना फटका बसू लागेल”, असं ते म्हणाले.

विश्लेषण : माजी सरन्यायाधीश CBI ला ‘पिंजऱ्यातला पोपट’ का म्हणाले होते? सीबीआय खरंच सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झालंय का?

महागाईचा दर कमी करणं अशक्य होऊन बसेल?

दरम्यान, रुबिनी यांनी अमेरिकेत महागाईचा दर कमी करणं अशक्य होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. कठोर निर्णय न घेतल्यास महागाईचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं लक्ष्य गाठणं ही अशक्यप्राय गोष्ट असेल, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Economist nouriel roubini predicts worst recession in till 2023 end pmw

ताज्या बातम्या