नवीन राज्यघटनेच्या मसुद्याच्या मान्यतेसाठी इजिप्तमध्ये घेण्यात आलेल्या जनमतामध्ये, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या नेतृत्वाखालील इस्लामवाद्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या नवीन आणि वादग्रस्त मसुद्याच्या बाजूने ६४ टक्के जनतेने कौल दिला आहे.
इजिप्तमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या नव्या मसुद्यासाठी जनमताच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या. यामध्ये सुमारे ६४ टक्केलोकांनी नव्या मसुद्यास अनुकूलता दर्शविली. या विजयासह कट्टरतावादी आणि इस्लामवाद्यांनी तुलनेने धर्मनिरपेक्ष असणाऱ्या विरोधकांना चारी मुंडय़ा चीत केले आहे. होस्नी मुबारक यांना २०११ मध्ये पायउतार व्हावे लागल्यानंतर या कट्टरतावाद्यांना कोणत्याही निवडणुकीत किंवा जनमतात पराभव पत्करावा लागलेला नाही. या जनमताच्या पहिल्या फेरीचा निकाल १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता, यामध्ये मसुद्यास ५६.५ टक्केलोकांनी अनुकूलता दर्शविली होती, मात्र दुसऱ्या फेरीत मसुद्याच्या बाजूने ७१ टक्केमते पडल्याने ही आघाडी वाढली. दरम्यान, या जनमतादरम्यान दबावाचा वापर करण्यात आल्याचा तसेच येथे काही गैरप्रकार घडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
राज्यघटनेच्या नव्या मसुद्यास इजिप्तमध्ये मान्यता
नवीन राज्यघटनेच्या मसुद्याच्या मान्यतेसाठी इजिप्तमध्ये घेण्यात आलेल्या जनमतामध्ये, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या नेतृत्वाखालील इस्लामवाद्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या नवीन आणि वादग्रस्त मसुद्याच्या बाजूने ६४ टक्के जनतेने कौल दिला आहे.
First published on: 24-12-2012 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egyptian constitution draft approved