बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भाजपाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जदयूला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे. तर महाआघाडीने १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी ६७ जागांवर राजद, २० जागांवर काँग्रेस आणि डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपाला दोन जागांवर, एमआयएमला दोन जागांवर तर एलजेपी आणि इतर यांना चार जागांवर आघाडी मिळाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार आत्ता तरी एनडीएला आघाडी मिळते आहे असंच दिसतं आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

आणखी वाचा- NDA जिंकली तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? भाजपा म्हणते…

बिहार निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अनेक एग्झिट पोल्सनीही बिहारमध्ये सत्तापालट होईल असेच अंदाज वर्तवले होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर जे कल आत्तापर्यंत समोर आले आहेत त्यात NDA ला आघाडी मिळाली आहे असं चित्र आहे. आतापर्यंत एनडीएला २० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे.

आणखी वाचा- Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”

बिहारमध्ये तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली असून आज रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपा यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभं केलं आहे. मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत.