काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक जवळ येताच काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारणीसाठीही निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या ४५ वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक होणार आहे.

हेही वाचा – आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करा; माजी सरकारी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
no congress candidate in sangli in second consecutive lok sabha election
सांगलीतून सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा ‘हात’ गायब
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २३ सदस्य असून त्यापैकी १२ जणांची निवड निवडणुकीद्वारे घेण्यात येते, तर ११ जणांची निवड नामनिर्देशित पद्धतीने होते. जर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी १२ पेक्षा जास्त अर्ज आले, तर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी निवडणुका घेण्यात घेईल, अशी माहिती मधुसूदन मिस्री यांनी दिली आहे. तसेच यासाठी काँग्रेसचे राज्य निवडणूक अधिकारी सर्व राज्यांना भेट देणार असून सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – …तर नोटांवरही मोदींचाच फोटो छापला असता; अहमदाबादमधील कॉलेजला पंतप्रधानांचे नाव देण्याने वाद

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीयकार्यकारणीसाठी ४५ वर्षांनंतर पहिल्यांच निवडणुका होणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीसाठी शेवटची निवडणूक १९९७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारणी घोषीत करत होते.