जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. संपूर्ण बारामुल्ला जिल्ह्यामध्ये खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


 
बारामुल्लाच्या सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. त्यानंतर गुरूवारी पहाटेपासूनच सुरक्षा रक्षकांनी परिसराची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आणि दहशतवाद्यांना घेरलं. सद्यस्थितीला किमान दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी घेरल्याची माहिती आहे.


यापूर्वी बुधवारी सकाळी जम्मू-श्रीनगर महामार्गाजवळ झज्जर कोटली येथे दहशतवाद्यांनी वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला होता. कालपासून या जंगल परिसरातही सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहिम सुरू असून जंगलात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encounter in sopore of baramula between security forces and terrorists internet suspended
First published on: 13-09-2018 at 09:53 IST