सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन केलेली शांतता आपले सरकार आणखी बळकट करेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या एकीकृत मुख्यालयांच्या पहिल्या बैठकीत दिले.
मुख्यमंत्री सईद यांनी उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांच्या सोबतीने लष्कर आणि गुप्तचर संस्थेचे अधिकारी यांच्यासह सुरक्षा संस्थांचे सादरीकरण पाहिले. यापूर्वी २१ जानेवारी रोजी राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकीकृत मुख्यालयांच्या बैठकीनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती आणि दहशतवाद्यांनी केलेले घुसखोरीचे प्रयत्न यांचा सईद यांनी आढावा घेतला. मुख्यालयांत सैन्य, निमलष्करी दले, पोलीस, तसेच केंद्रीय व राज्य गुप्तचर संस्थांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहे.लष्करी कमांडर्स त्यांचे सल्लागार आहेत.