युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत कोणताही आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी न्यायालय सरकारला कोणताही आदेश देणार नाही, असे म्हटले आहे. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उचलण्यात येणारी सर्व पावले, पालकांसाठी हेल्पलाइनची शक्यता इत्यादींबाबत केंद्र सरकारकडून सूचना घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने अॅटर्नी जनरल यांना सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनमधून एका भारतीय मुलीला परत आणण्यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी, आम्ही भूतकाळातून काहीही शिकलो नाही हे दुर्दैवी आहे, असेही म्हटले. न्यायालयाने कोणताही आदेश न देता आम्हाला फक्त विद्यार्थ्यांची काळजी असल्याचे सांगितले. फातिमा अहाना नावाच्या विद्यार्थिनीने तिला युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही विद्यार्थिनी रोमानियाच्या सीमेवर अडकली होती आणि तिला पुढे जाऊ दिले जात नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evacuation of indians from ukraine the cji said we have not learned lessons from history abn
First published on: 04-03-2022 at 14:30 IST