भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे शनिवारी सिकंदराबाद येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. २००१मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात शस्त्रास्त्रे करार करताना लक्ष्मण यांनी एक लाख रुपयांची लाच घेतली होती. ‘तेहेलका’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2014 रोजी प्रकाशित
बंगारू लक्ष्मण यांचे निधन
भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे शनिवारी सिकंदराबाद येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

First published on: 02-03-2014 at 04:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex bjp chief bangaru laxman passes away in hyderabad