हबल दुर्बिणीने एकमेकांशी आंतरक्रिया करणाऱ्या एआरपी १४२ या दीर्घिका युगुलाची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. या दीर्घिका भटकत-भटकत एकमेकींच्या जवळ आल्या असून त्यांच्यातील आंतरक्रियांमुळे त्यांच्यात अनेक बदलही घडून येत असल्याचे दिसून आले आहे.
कधी या दीर्घिका एकमेकांत मिसळलेल्या दिसतात तर कधी एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या दिसतात. या दीर्घिकांच्या छायाचित्रात मध्यभागी एक निळा ठिपका दिसतो ती एनजीसी २९३६ दीर्घिका आहे. ती या एआरपी १४२ या दीर्घिका युगुलाचा भाग आहे. हौशी खगोलवैज्ञानिकांनी तिला पेंग्विन किंवा पॉरपॉइज अशी नावे दिली आहेत. ही दीर्घिका प्रमाणित सर्पिलाकार दीर्घिका होती पण नंतर दुसऱ्या दीर्घिकेच्या गुरुत्वाने तिचे तुकडे झाले, तिचे अवशेष अजूनही विखरून पडलेले दिसतात. त्यातील एक तुकडा हा पेंग्विन दीर्घिकेचा डोळा आहे, त्यातून पूर्वीच्या दीर्घिकेचे बाहू कसे असावेत याचा अंदाज येतो. हे बाहू आता पेंग्विन दीर्घिकेचे शरीर आहे व तिच्या छायाचित्रात जे आडवे लाल-निळे चमकदार पट्टे दिसतात ते पूर्वीचे बाहू आहेत. एनजीसी २९३७ ही चमकदार पांढरी लंबवर्तुळाकार दीर्घिका आहे. एनजीसी २९३६ या दीर्घिकेचे प्रकाशमान पट्टय़ासारखे बाहू हे एनजीसी २९३७ या दीर्घिकेपर्यंत पोहोचलेले दिसतात. या दोन दीर्घिकांमधील गुरुत्वीय आंतरक्रियेचे परिणाम फार घातक आहेत. एआरपी १४२ हे दीर्घिका युगुल जेव्हा जवळ येते तेव्हा त्यांच्यातील आंतरक्रिया ही द्रव्याची देवाणघेवाण करणारी असते. या दीर्घिका युगुलाच्या वरच्या भागात दोन चमकदार तारे दिसतात. त्यांच्याभोवती निळे द्रव्य दिसते ती दुसरी दीर्घिका आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2013 रोजी प्रकाशित
दीर्घिका युगुलाचे स्फोटक मिलन
हबल दुर्बिणीने एकमेकांशी आंतरक्रिया करणाऱ्या एआरपी १४२ या दीर्घिका युगुलाची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. या दीर्घिका भटकत-भटकत एकमेकींच्या जवळ आल्या असून त्यांच्यातील आंतरक्रियांमुळे त्यांच्यात अनेक बदलही घडून येत असल्याचे दिसून आले आहे.

First published on: 22-06-2013 at 02:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosive gathering of couple galaxy