युनाटडेड किंगडममध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. यूकेसमोर आज करोना व्हायरसबरोबर व्हेंटिलेटरचेही आव्हान आहे. यूकेमध्ये व्हेंटिलेटरची मोठया प्रमाणावर कमतरता आहे. याच समस्येवर तोडगा शोधून काढण्यासाठी आता फॉर्म्युला वन रेसिंग टीम्स, कॉर्पोरेटस आणि सिमेन्स एजी, एअरबस एसई या कंपन्यांनी काम सुरु केले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेला व्हेंटिलेटरची कमतरता जाणवू नये, यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी मागच्या आठवडयात सर्व उत्पादकांना ३० हजार व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. सध्या आठ हजार व्हेंटिलेटर कार्यरत आहेत.

मंगळवारी यूकेमध्ये १४०० जणांना करोना व्हायरसची लागण झाली आणि ८७ जणांचा मृत्यू झाला. त्यावरुन आव्हानाचे गांभीर्य लक्षात येते. “व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे उद्या डॉक्टरांना कुठल्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवायचे आणि कोणाला नाही हा निर्णय घेणे भाग पडेल असा इशारा आरोग्य सेवेच्या प्रमुखांनी दिला आहे.

व्हेंटिलेटरच्या उत्पादनासाठी एकूण तीन गट बनवण्यात आले आहेत. २० मार्च रोजी फॉर्म्युला वनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात यूकेमधील टीम्स व्हेंटिलेटर प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फॉर्म्युला वनच्या सर्व टीम्समध्ये बेस्ट डिझायनर आहेत. उच्च दर्जाचे मशीन बनवण्याची त्यांची क्षमता आहे.

F 1 च्या सात टीम्सनी व्हेंटिलेटरचे डिझाइन आणि चाचणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या टीम्समध्ये तज्ञ इंजिनिअर्सचा भरणा आहे. करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी वाहन कंपन्यांकडे मदत मागणारा यूके एकमेव देश नाही. अमेरिकेतही फोर्ड मोटर, जनरल मोटर्स या कंपन्यांची श्वसनासंबंधीच्या उपकरणाच्या निर्मितीला गती दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: F1 helps uk race towards target of 30000 ventilators dmp
First published on: 26-03-2020 at 13:17 IST