फेसबुकवरील मैत्री तरुणीला पडली महागात; वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावून केला बलात्कार

या घटनेनंतर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे

Rape-Victim
या दोघांची मैत्री फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. (प्रातिनिधिक छायाचित्र)

दिल्लीच्या एका मुलीवर हरियाणामध्ये बलात्कार झाल्याची एक घटना समोर येत आहे. या तरुणीला तिच्या Facebook वर झालेल्या मित्राने वाढदिवसाच्या बहाण्याने हरियाणातल्या सोनीपत इथं बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे.

ही तरुणी दिल्लीची रहिवासी आहे तर आरोपी हरियाणामधल्या सोनीपतमधल्या मदीना गावचा आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की दोघांची मैत्री Facebookच्या माध्यमातून झाली होती. आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या बहाण्याने पीडितेला सोनीपतमधल्या गीता भवन चौकातल्या एका हॉटेलमध्ये बोलावलं. ती तिथे आल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने अनेकदा विरोध करुनही त्याने जुमानलं नाही, असं पीडित तरुणीचं म्हणणं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- उत्तर प्रदेशात महिला शिपायावर सासऱ्याने केला बलात्कार; पतीने दिला ट्रिपल तलाक

गेल्या काही दिवसांत अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. राजस्थानच्या धौलपूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेवर तिच्याच पतीने काही युवकांकडून सलग दोन दिवस बलात्कार करवून घेतला आहे. यावेळी तोही घटनास्थळी उपस्थित होता. एवढंच नाही, या महिलेने त्यांना विरोध केला असता तिच्या खासगी अवयवांना मिरचीपूड आणि बाम लावून तिला बेशुद्धही करण्यात आलं.

आणखी वाचा- घृणास्पद! हुंड्याच्या लालसेपोटी पतीने आपल्यासमोरच करवला पत्नीवर अमानुष बलात्कार

तर उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये एका महिला शिपायावर सासऱ्याने बलात्कार केल्यानंतर पतीने तिला ट्रिपल तलाक दिला आहे. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित महिला शिपयाचा सासरा आणि पती दोघंही पोलिसात आहेत. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार देत न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती, सासरा आणि सासूसह ७ जणांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Facebook friend rape girl birthday celebration hotel haryana sonipat police vsk