नवी दिल्ली : काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशिदीबाबत वाद सुरू असतानाच, या प्रकरणी वस्तुस्थिती उघड होऊ द्यायला हवी़, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी सांगितले. संघाचा माध्यम विभाग असलेल्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना संघाचे अ. भा. प्रसार प्रमुख सुनील आंबेकर यांनी या मुद्दय़ाला हात घातला. ‘ज्ञानवापीबाबत वस्तुस्थिती बाहेर येऊ द्यायला हवी’, असे ते म्हणाले.

ज्ञानवापी मशीद ही काशी विश्वनाथ मंदिरालगत स्थित असून, मशिदीच्या बाहेरच्या भिंतीवर असलेल्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या काही हिंदु महिलांच्या याचिकेवर न्यायालय सध्या सुनावणी करत आहे.