प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध कवी आणि लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. मीना देशपांडे या प्रसिद्ध लेखिका असण्यासोबतच आचर्य अत्रे यांच्या कन्या होत्या. मीना देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती असं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीना देशपांडे यांची साहित्यसंपदा –

आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह), अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८), पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह) ,मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी), मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै), ये तारुण्या ये (कथासंग्रह), हुतात्मा (कादंबरी)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous writer meena deshpande passed away ssj
First published on: 07-09-2020 at 08:26 IST